मुंबई : 'बाहुबली द कनक्लूजन' प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता प्रभासच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झालीये. त्याची लोकप्रियता केवळ भारतापुरतीच मर्यादित राहिलेली नाहीये तर भारताबाहेरही त्याची लोकप्रियता वाढलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमासाठी 5 वर्षे दिल्यानंतर सुट्टीसाठी म्हणून प्रभास अमेरिकेत पोहोचला. मात्र तेथील विमानतळावरील चाहत्यांची गर्दी पाहून तो भारावूनच गेला. 


विमानतळावर पोहोचताच चाहत्यांनी त्याला घेरले. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रभास फारच लाजाळू आहे आणि सार्वजनिक ठिकाणी तो एखाद्या अज्ञात व्यक्तीसारखाच वावरतो. अमेरिकेतील विमानतळावर प्रवाशांनी केलेल्या या जंगी स्वागतानंतर तो चांगलाच भारावला. 


'बाहुबली 2' ला मिळत असलेल्या जबरदस्त प्रतिसादाबद्दल त्याने फेसबुक पोस्टद्वारे आभार मानलेत.