मुंबई : प्रेम कुणाचं कधी कुणाशी होईल हे काहीही सांगत येत नाही, तसंच बाहुबली चित्रपटाची नायिका तमन्ना भाटीयाचा झालं. तमन्नाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मेकअप आर्टीस्टसोबत आपण रात्र घालवत असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे, यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजय देवगण आणि अक्षय कुमार सारख्या कलाकारांसोबत काम केलेल्या तमन्नाने मेकअप आर्टीस्ट सोबत प्रेमसंबंध असल्याचं म्हटलं आहे, एका इव्हेन्टवेळी तमन्नाने ही बाब स्पष्ट केली आहे.


एका अकॅडमी लाँचच्यावेळी ती बोलत होती. मेकअप आर्टीस्ट बिली माणिक आणि तिने ही गोष्ट सांगितली. त्यांच्या दिवसाची सुरूवात मेकअप करण्यापासून होते आणि मेकअप उतरल्यानंतर ते एकत्र राहतात. 


मेकअप आर्टिस्ट बिली माणिक याच्यावर तिचे प्रेम आहे. दोघांत इतकी चांगली मैत्री आहे की, ती त्याच्यासोबत रात्र काढते.