मुंबई : दिग्दर्शक एस एस राजामौलींनी पडद्यावर उतरवलेला 'बाहुबली' भावला असेल किंवा तुम्ही वाचनप्रिय व्यक्ती असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बाहुबली' आता लवकरच पुस्तक रुपातही वाचकांच्या समोर येणार आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम आणि तेलगू भाषेत ही पुस्तकं उपलब्ध होणार आहेत. तीन पुस्तकांच्या सीरिजमध्ये ही पुस्तकं 'वेस्टलँड' घेऊन येणार आहे. 


'द राईज ऑफ शिवगामी' असं या सीरिजमधल्या पहिल्या भागाचं नाव असेल. हे पुस्तक आनंद नीलकांतन यांनी लिहिलंय. या पुस्तकात शिवगामीचं लहानपण आणि कटप्पाबद्दल लेखकानं लिहिलंय. 'बाहुबली' हा विषय असला तरी शिवगामी आणि कटप्पा या पुस्तकातले मुख्य भागापैंकी एक असतील.