मुंबई : प्रेमाची भाषा वेगळीच असते. ती सांगायला शब्द लागत नाहीत. प्रेम करणाऱ्यांना एकमेकांच्या नजरेतून प्रेम जाणवते. ही गोष्ट आहे दोन अश्या लोकांची ज्यांचे स्वतःचे आयुष्य एका वळणावर येऊन थांबले आहे. इशा आणि प्रसाद आणि यांच्यातील दुआ आहे प्रसादच पाळणाघर आणि ईशाचा मुलगा अद्वैत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 प्रेम कधी कोणामध्ये आणि कोणत्या वळणावर होईल खरंच सांगू शकत नाही. "प्रेम हे" ची सोमवारी येणारी नवीन गोष्ट आहे "बंध रेशमाचे “. येत्या सोमवार २० मार्च आणि मंगळवार २१ मार्च ला रात्री ९ वाजता सुनील बर्वे आणि वीणा जामकर यांच्या तगड्या अभिनयाने सजलेली एक सुंदर निरागस प्रेमकथा झी युवावर पाहायला मिळेल.
 
इशा एक स्वावलंबी स्त्री. एडव्हर्टाइसिंग प्रॉफेशनल. नवऱ्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर ती तिचा मुलगा अद्वैतबरोबर नवीन शहरात आलीय. अद्वैत लहान असल्यामुळे कामाला जाताना मुलासाठी घराजवळच पाळणाघर ठरवते. या पाळणाघराचा मालक आहे प्रसाद रणदिवे. एक अविवाहित पण हसतमुख आणि लहान मुलांमध्ये रमणारा , पाळणाघर धंदा म्ह्णून न पाहणारा ४० -४५ मधील माणूस. 


सुरुवातीला इशाला प्रसादच लहान मुलांसारखं वागणं जराही आवडतं नसत. पण जशी जशी ती त्याला ओळखू लागते तशी तशी ती प्रसादच्या प्रेमात पडू लागते. पण घटस्फोटित इशा आणि अविवाहित प्रसाद यांच्यात अजूनही काही असतं ज्यामुळे ही गोष्ट वेगवेगळी वळण घेते. इशा आणि प्रसाद चे प्रेम फुलते कि खोट्या समाजासमोर झुकते. हे सर्व पाहण्यासाठी झी युवावरील प्रेम हे या मालिकेतील “बंध रेशमाचे ". ही गोष्ट पाहणे उत्कंठावर्धक नक्कीच ठरेल,
 
"बंध रेशमाचे" ही झी युवाची संकल्पना असून सुनील बर्वे आणि वीणा जामकर हे मुख्य भूमिकेत आहेत, तर गणेश पंडित यांच्या लेखणीतून कथा साकारली आहे आणि या गोष्टीचे दिग्दर्शन प्रवीण परब यांनी केले आहे. दर सोमवार-मंगळवार रात्री ९ वाजता वेगवेगळ्या कथांतून "प्रेम हे”झी युवावर उलगडत जाईल.