मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बेगम जान' या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेत्री विद्या बालन प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यशस्वी ठरलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बेगम जान'चा ट्रेलर पाहताना हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारण्यात यशस्वी ठरू शकेल, असंही दिसतंय. परंतु, तुम्हाला माहीत आहे का 'बेगम जान' हा 2015 मध्ये आलेल्या ‘राजकाहिनी’ या बंगाली चित्रपटाचा रिमेक आहे. 1947 च्या भारत-पाक फाळणीवर आधारित हिंदी आणि बंगाली या दोन्ही सिनेमाचं दिग्दर्शन श्रीजीत मुखर्जी यांनी केलंय. 


बंगाली सिनेमात रितूपर्णा सेनगुप्ता हिनं मुख्य भूमिकेत जान ओतली होती. 'राजकाहिनी' या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हालाही याचा अनुभव येईल.