भाभीजी टीव्ही बंदीवर भडकली...
माझ्यावर बंदी घालणारे ते कोण, मी आता छोट्या पडद्यावर येणार नाही. मीच आता त्यांच्यावर बंदी घातले अशा शब्दांत सर्वांची आवडती अंगुरी भाभी फेम शिल्पा शिंदे हिने टीव्ही असोशिएशनवर पलटवार केला आहे.
मुंबई : माझ्यावर बंदी घालणारे ते कोण, मी आता छोट्या पडद्यावर येणार नाही. मीच आता त्यांच्यावर बंदी घातले अशा शब्दांत सर्वांची आवडती अंगुरी भाभी फेम शिल्पा शिंदे हिने टीव्ही असोशिएशनवर पलटवार केला आहे.
भाभीजीचं करिअर धोक्यात
टीव्ही सीरियल 'भाभीजी घर पर हैं' मधील शिल्पा शिंदेची टीव्ही स्क्रीनवरुन कायमची गायब होण्याची शक्यता आहे. शिल्पा शिंदेवर सिने अॅड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन लाइफ टाइम बॅन लावण्याच्या विचारात आहे. अँड टीव्हीवरील शो मध्येच सोडल्याचा तिच्यावर आरोप आहे.
तेलंही गेलं तूपही गेलं...
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार CINTAA ने जर लाइफ टाइम बॅन लावला तर तिला कपिल शर्माच्या शोमधून ही बाहेर पडावं लागू शकतं. शिल्पा विरोधात एक नॉन-को-ऑपरेशन ऑर्डर काढण्याचा देखील निर्णय झाला आहे. यानंतर कोणताच प्रोड्युसर शिल्पासोबत काम करू शकणार नाही.
काय आहे शिल्पावर आरोप
शिल्पाने चॅनलवर त्रास देत असल्याचा आरोप लावलाय. मेडिकल अनफिट असल्यामुळे तिने हा शो सोडल्याचं म्हटलं आहे. तर या शोच्या प्रोड्युसरने हे आरोप फेटाळून लावले आहे.