भन्साळी थांबवणार राजस्थानमधलं `पद्मावती`चं शूटिंग
पद्मावती या चित्रपटाच्या शूटिंगवेळी झालेल्या हल्ल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी चित्रपटाचं राजस्थानमधलं शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.
जयपूर : पद्मावती या चित्रपटाच्या शूटिंगवेळी झालेल्या हल्ल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी चित्रपटाचं राजस्थानमधलं शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. संजय लीला भन्साळींकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
मेहरानगड किल्ल्यात शूटिंग सुरू असताना राजपूत कर्नी सेनेकडून 'पद्मावती' सिनेमाचा निषेध करत सामानाची तोडफोड केली. 'पद्मावती' सिनेमात इतिहासाशी छेडछाड करण्यात येत असल्याचं कर्नी सेनेचं म्हणणं होतं. यावेळी, किल्ल्याच्या परिसरात असलेले अनेक साहित्याची तोडफोड केली गेली, यानंतर शूटिंग थांबवण्यात आलं. दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी हल्ल्याचा निषेध केला आहे.