मुंबई : बिग बॉस 10मधील स्पर्धक मनु पंजाबीच्या फॅन्ससाठी वाईट बातमी आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, बिग बॉसचा स्पर्धक मनु पंजाबीने बिग बॉसचे घर सोडलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, असंही सांगितलं जातय की त्याच्या बिग बॉसचे घर सोडण्याचे कारण एलिमिनेशनमुळे नव्हे तर दुख:द कारणामुळे त्याला घर सोडावे लागलेय. 


रिपोर्टनुसार मनु पंजाबीच्या आईचे निधन झाल्याने त्याला हे घर सोडावे लागलेय. मात्र ही गोष्ट न सांगताच त्याला घरातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. 


बिग बॉसच्या घरात हे पहिल्यांदाच घडत नाहीये. याआधीही बिग बॉसच्या 9व्या सीझनमध्ये कीथ सेक्वेरासोबत असेच काहीसे घडले होते. भावाचे निधन झाल्याने मध्येच बिग बॉसचे घर सोडून जावे लागले होते.