मुंबई : अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांच्या लग्नानं अनेकांचं ध्यान खेचून घेतलं... सध्या यो दोघांकडे काही खास प्रोजेक्टही नाहीत... त्यामुळे हे कपल अजूनही हनीमून मोडमध्येच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बार्सिलोनामध्ये बिपाशा-करण रिकाम्या वेळेचा आनंद घेत आहेत. या दोघांच्या मिळकतीबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बिपाशा तिच्या पतीपेक्षा आठ पटीनं अधिक श्रीमंत आहे. 


बिपाशाची संपत्ती


मोठ्या ब्रॅन्डचं एन्डॉर्समेंट हे बिपाशाच्या मिळकतीचं मुख्य साधन आहे. बिपाशाची स्वत:ची तीन घरं आहेत. यातील दोन घरं मुंबईत तर एक घर कोलकातामध्ये आहे. याशिवाय, बिपाशा स्टेज शोजसाठी जवळपास 2 करोड रुपये घेते.


बिपाशाकडे तिच्या पतीपेक्षा जास्त कार आहेत. तिच्याकडे 3 लग्झरी घरांशिवाय 3 लग्झरी कारदेखील आहेत. बिपाशाकड़े एक पॉर्श, एक ऑडी 7 आणि एक कटसी बीटल कार आहे. 


करणची संपत्ती


तर करण सिंग ग्रोवरचं मुंबईत एक घर आहे. करणची नेटवर्थ कमाई जवळपास 13.4 करोड रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. त्याच्याकडे एक लग्झरी कारही आहे. 


करण एक दिवसाच्या शुटींगसाठी जवळपास 80,000 रुपये चार्ज करतो. त्याच्या कमाईचं मुख्य साधन टीव्ही शोज आहे.