नवी दिल्ली : बॉलिवूड 'क्वीन' कंगना रानावत तिच्या अभिनयामुळे फॅन्समध्ये चर्चेत असते. ती तिच्या भावना नेहमी मन-मोकळ्यापणे जगासमोर मांडते. मुळची हिमाचलची असणारी कंगना आता आई बनण्याची इच्छा असल्याचं म्हणतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाला आई बनायचं आहे. ती म्हणते की, आता मी पूर्णपणे स्वत:वर अवलंबून आहे. एका मुलाखतीत बोलतांना तिने ही इच्छा व्यक्त केली आहे.
कंगना म्हणते की, मी कधीही असा विचार नाही केला की, कधी मी अशा प्रकारे बोलेल. पण ही फिलिंग लपवणं आता माझासाठी अवघड आहे. मला त्या दिवसाची मी आतूरतेने वाट पाहतेय. ती नेहमी आत्मविश्वासाने नि़डरपणे प्रश्नांची उत्तरं देते.


ती म्हणते की, मला माझ्यामध्ये नेहमी एक बैचेनपणा अनुभवायला मिळतो. जो नेहमी रागाच्या रुपात व्यक्त होतो. ही वेळ तेव्हा येते जेव्हा मी स्वत:ला समजण्याचा प्रयत्न करते. बॉलिवूडने मला व्यक्त होण्याचं स्वतंत्र दिलं. जर ३-४ दिवस मी काम नाही केलं तर मला त्रास होतो.


कंगना पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल दोन वेगळी मत ठेवते. कशाप्रकारे संघर्ष करुन ती बॉलिवूडमध्ये पोहोचली याबाबत ती नेहमी बोलते.