या बॉलीवूड सेलिब्रिटीजनी केली तीन ते चार लग्न
हम प्यार एक बार करते हैं और शादी भी एक ही बार करते हैं, शाहरुख खानचा हा फेमस डायलॉग.
मुंबई : हम प्यार एक बार करते हैं और शादी भी एक ही बार करते हैं, शाहरुख खानचा हा फेमस डायलॉग. शाहरुखनं चित्रपटाबरोबरच खऱ्याखुऱ्या आयुष्यातही हाच डायलॉग फॉलो केला आहे. पण बॉलीवूडमध्ये अशा अनेक सेलिब्रिटीज आहेत ज्यांनी एक दोन नाही तर तब्बल तीन ते चार वेळा लग्न केलं आहे.
संजय दत्तनं केली 3 लग्न
बॉलीवूड अभिनेता संजय दत्तनं तीन लग्न केली. संजय दत्तचं पहिलं लग्न झालं रिचा शर्माबरोबर, पण ब्रेन ट्यूमर झाल्यामुळे रिचाचा मृत्यू झाला. यानंतर संजय दत्त व्यसनाधीन झाला, यावेळीच रिया पिल्लईबरोबर संजयनं लग्न केलं, पण या दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि रियानं संजयला सोडून दिलं. रियानंतर आता संजय दत्तनं मान्यताशी लग्न केलं.
अदनान सामीनं केली 3 लग्न
पाकिस्तानी आणि बॉलीवूड गायक अदनान सामीनंही तीन लग्न केली आहेत. बॉलीवूड चित्रपट हीना मध्ये मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री जेबा बख्तियार अदनानची पहिली बायको आहे. अदनाननं दुबईच्या सबाह गलादेरीबरोबरही लग्न केलं, पण ते अयशस्वी ठरलं. यानंतर अदनानं तिसरं लग्न रोया फरयाबीबरोबर केलं.
किशोर कुमारनं केली 4 लग्न
प्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांनीही चार लग्न केली. किशोर कुमार यांचं पहिलं लग्न झालं ते बंगाली गायिका आणि अभिनेत्री रुमा गुहाबरोबर, पण या दोघांचा संसार अयशस्वी ठरला. यानंतर किशोर कुमार यांनी मधुबालाशी लग्न केलं, पण लगेचच मधुबालाचं निधन झालं. मधुबालाच्या मृत्यूनंतर किशोर कुमार यांनी योगिताबरोबर लग्न केलं. योगितापासूनही किशोर कुमार वेगळे झाले आणि मग त्यांनी लीना चंदावरकरशी लग्न केलं.
सिद्धार्थ रॉय कपूरनं केली 3 लग्न
सिद्धार्थ रॉय कपूरनं विद्या बालनशी लग्न करण्याआधी दोन लग्न केली होती. सिद्धार्थनं पहिलं लग्न त्याची लहानपणीची मैत्रिण आरती बजाजबरोबर केलं होतं. पहिलं लग्न तुटल्यावर सिद्धार्थनं टीव्ही प्रॉ़ड्यूसर कविताबरोबर लग्न केलं. कविताबरोबरचा संसार मोडल्यानंतर आता सिद्धार्थनं विद्या बालनशी लग्न केलं आहे.
विधु विनोद चोप्रानं केली 3 लग्न
बॉलीवूडमधले प्रख्यात प्रोड्यूसर विधू विनोद चोप्रा यांनीही तीन लग्न केली. विधू विनोद चोप्रांनी पहिलं लग्न केलं फिल्म एडिटर रेनू शालुजा यांच्याबरोबर. यानंतर त्यांनी दुसरं लग्न शबनम सुखदेव या शॉर्टफिल्ममेकरशी केलं, तर चित्रपट समिक्षण अनुपमा चोप्राबरोबर त्यांनी पुन्हा संसार थाटला.