मुंबई : बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला सैराट सिनेमाचा अभिनेता आकाश ठोसर म्हणजेच पर्शाला भेटायचं होतं, सलमानने पर्शाची भेट देखील घेतली. सलमान आणि आकाशने एकत्र फोटो देखील काढलाय, हा फोटो आकाशने शेअर केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लमान खानला सैराट सिनेमा पाहिल्यानंतर प्रत्यक्षात आकाशला भेटून त्याचे कौतुक करायचे होते त्यामुळे ही भेट झाली आहे. इंग्रजी वेबसाइट businessofcinema ने दिलेल्या वृत्तानुसार आकाश ठोसर आणि अभिनेता सलमान खान यांची भेट सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये झाली.


सैराट सिनेमाचे कौतुक अभिनेता आमिर खान, सलमान, खान, शाहरुख खान, इरफान खान यांनी यापूर्वीच केलं आहे.


या सिनेमाची आणि याच्या गाण्यांची भूरळ बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान यालाही पडली असून त्याने परश्याची भेट घेतली आहे.