मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ब्रेट लीचा 'अनइंडियन'हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ब्रेट ली द कपील शर्मा शो मध्ये आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाच्या प्रमोशनबरोबरच ब्रेट लीनं क्रिकेटच्या मैदानावरचे काही रंजक किस्से सांगितले. या शोमध्ये कपीलनं स्लेजिंगबाबत ब्रेट लीला प्रश्न विचारले. स्लेजिंग होतं हे ब्रेट लीनं मान्य केलं आहे, तसंच स्लेजिंगहे असावं पण कोणी लक्ष्मणरेषा ओलांडू नये, असं ली म्हणाला आहे. 


कोहलीसारखे चांगले क्रिकेटपटू असल्यामुळे भारताला स्लेजिंगची गरज नसल्याची प्रतिक्रिया ब्रेट लीनं दिली आहे. आयर्लंडचा संघ सर्वाधिक स्लेजिंग करत असल्याचं ब्रेट ली म्हणाला आहे.