मुंबई :  'चला हवा येऊ द्या च्या या आठवड्यात सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  ध्यानीमनी चित्रपटाची टीम आणि मंगळवारी रंगणार आहे व्हॅलेंटाईन्स स्पेशल एपिसोड काही खास जोड्यांसोबत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी भारत गणेशपुरे याने महेश मांजरेकरांचा गेटअप करून धम्माल केली. 


 



सोमवारच्या भागात ध्यानीमनी चित्रपटातील प्रमुख कलाकार महेश मांजरेकर, अश्विनी भावे, अभिजीत खांडकेकर, मृण्मयी देशपांडे, लेखक प्रशांत दळवी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत मेधा मांजरेकर यांचीही विशेष उपस्थिती होती. 
 
 अश्विनी भावे यानिमित्ताने पहिल्यांदाच या कार्यक्रमात आल्या त्यामुळे मग थुकरटवाडीतल्या मंडळींनीही त्यांच्या स्वागताची विशेष तयारी केली नसती तरच नवल. अश्विनी भावे यांचा गाजलेला हळद रुसली कुंकु हसलं या चित्रपटाचं धम्माल रुप या मंडळींनी सादर केलं आणि सर्वांनाच खळखळून हसवलं. हा धम्माल भाग प्रेक्षकांना आज रात्री ९.३० वा. बघायला मिळेल.