मुंबई :  बाहुबली-2 या चित्रपटाचा फर्स्ट लूक राजमौलीनं ट्विटरवरून हा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यामध्ये प्रभासच्या एका हातात साखळदंड आणि दुसऱ्या हातात काठी दाखवण्यात आली आहे तर बॅकग्राऊंडला विजा चमकताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाहुबली-2ची प्रेक्षक आतुरतेनं वाट बघत आहेत. बाहुबलीच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. कट्टपानं बाहुबलीला का मारलं याचं उत्तर प्रेक्षकांना पहिल्या भागात मिळालं नाही, ते आता दुसऱ्या भागात मिळेल अशी अपेक्षा आहे.


पाहा बाहुबली-2चा फर्स्ट लूक