मुंबई : 'पिस्तुल्या', 'फँड्री' आणि आता 'सैराट' मराठी सिनेमाचे दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. 'सैराट'च्या टीमचे खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी बंगला वर्षावर खास कौतुक केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैराटची टीमचे प्रमुख कलाकार आर्ची अर्थार रिंकू राजगुरु (प्रेरणा), परशा अर्थता आकाश ठोसर आणि खुद्द दिग्दर्शनक नागराज मंजुळे आणि त्यांची सर्व टीम यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्याशी खुल्या मनाने गप्पा मारल्यात. 


 'पिस्तुल्या', 'फँड्री' आणि आता 'सैराट' या सिनेमातील अनुक्रमे सूरज पवार, सोमनाथ अवघडे आणि रिंकू राजगुरु यांनी सलगपणे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. ही हॅट्रिक साधणारा कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे. नागराच यांनी अस्सल ग्रामीण भागात सिनेमाचे शूटिंग केले. कोणताही बडेजावपणा न करता ग्रामीण भागातील कलाकारांची निवड केली आणि यश खेचून आणली. या सिनेमाने ११ दिवसात ४१ कोटींचे गल्ला जमवलाय.



मला वेळच नाही!


राज्यात १४ हजार शो सध्या सुरु आहेत. हे यश खूपच समाधान देणारे आहे. या सिनेमाने सर्वांनाच थिएटरकरडे खेचून आणले. आज मला अभिनंदनाचे फोन येत आहेत. एसएमएस येत आहेत. मला प्रत्येक मिनीट ४ -५ कॉल येत आहे. मला फोन घ्यायलाच वेळ मिळत नाही. मिळाणार प्रतिसाद पाहून याचे मला खूप समाधान असून आनंद आहे. त्या सर्वांचे धन्यवाद. आज मराठी भाषा, मराठी जगणं काय आहे, लोकांना यातून समजल आहे. आपण हिंदीला जास्त प्राधान्य देत येतोय, हे लक्षात येत नाही. मात्र, या सिनेमाने मराठीपण दाखवून दिले आहे. आपली माणसं, मातीतील माणसं. आपली भाषा काय आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न झालाय. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने समाधान आहे.