मुंबई : 'कॉमेडी नाईटस विथ कपिल'मधून बाहेर पडल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा याचा नवा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. पण, कपिलच्या या नव्या शोला लोकांचा प्रतिसाद फारसा प्रतिसाद मिळू नये, याची खबरदारी कलर्स चॅनल घेताना दिसतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ एप्रिलपासून 'सोनी' टीव्हीवर 'द कपिल शर्मा शो' हा नवीन कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात गेस्ट असणार आहे किंग खान शाहरुख खान...


कपिलनं चॅनल आणि कार्यक्रम सोडल्यानंतर कलर्सनं 'कॉमेडी नाईट लाईव्ह' हा कार्यक्रम कृष्णा - सुदर्शन आणि इतरांसह सुरूच ठेवला. पण, त्याला फारशी लोकप्रियता मिळू शकली नाही. 


आता कपिलचा नवा शो येतोय तर या कार्यक्रमाला फारसा टीआरपी मिळू नये, यासाठी कलर्सनं एक खेळी खेळलीय. नियोजनानुसार, ज्या दिवशी कपिलच्या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित होईल, नेमक्या त्याच वेळी कलर्सवर 'कॉमेडी नाईट लाईव्ह' हा कार्यक्रम होणार होता. पण, आता मात्र यावेळी 'बाजीराव - मस्तानी' या सिनेमाचा प्रिमिअर शो कलर्सवर दिसणार आहे. 


गेल्या वर्षीचा सर्वात जास्त लोकप्रियता मिळवलेला सिनेमा 'बाजीराव-मस्तानी' या चॅनलवर एकाही ब्रेकशिवाय दिसणार आहे. 


म्हणजेच, कपिल आणि त्याच्या विरोधी चॅनलचं हे शीतयुद्ध यापुढेही सुरुच राहणार असं दिसतंय. पण, या सर्व खेळीत कपिल पुन्हा लोकांना प्रभावित करू शकेल का? मनमोकळं हसवू शकेल का? हे येणारा काळच सांगेल.