मुंबई : बॉलीवूडमधील कलाकारांची कमाई ही टीव्ही कलाकारांपेक्षा अधिक असते असे म्हटले जाते. मात्र कॉमेडियन कपिल शर्माने हे खोटं ठरवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
कपिल शर्मा हा टीव्ही जगतातील लोकप्रिय चेहरा आहे. त्याचा शो द कपिल शर्मा शोला चांगला टीआरपीही मिळतोय. कपिलने त्याच्या जोरावर या शोला नंबरवनवर नेले. त्यासाठी तो चांगले मानधनही घेतो. 


कपिल शर्माची महिन्याची कमाई इतकी आहे की तितके मानधन बॉलीवूडच्या फेमस अभिनेत्रींनाही मिळत नाही. आलिया भट्ट, श्रद्धा कपूर आणि परिणीती चोप्रासारख्या अभिनेत्री वर्षातून एखादा चित्रपट करतात.


ट्रेड अॅनॅलिस्टच्या मते या आलिया भट्टला एका चित्रपटासाठी 4-5 कोटी रुपये मिळतात. तर श्रद्धा कपूरला 3-4 कोटी आणि परिणीती चोप्राला 2-3 कोटी रुपये मिळतात. इतकंच नव्हे तर आदित्य रॉय कपूर आणि टायगर श्रॉफ यांनाही एका चित्रपटासाठी फक्त 6 कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळते. 


एका वेब पोर्टलच्या वृत्तानुसार, कपिल शर्मा आपल्या शोसाठी प्रतिदिन 60ते 80 लाख रुपये घेतो. म्हणजेच दर महिन्याला तो तब्बल 25 कोटी रुपये कमावतो. वर्षातून इतकी मोठी रक्कम वर्षातून एखादा चित्रपट करणाऱ्या अभिनेत्यालाही मिळत नाही. 


2014-15पासून कपिलच्या मानधनात वाढ होतेय. ज्याप्रमाणे शोचा टीआरपी वाढतो त्याप्रमाणे कपिलचे मानधनही. मोठ्या कमाईच्या यादीत कपिल शर्माच्यानंतर सुनील ग्रोव्हरचा नंबर लागतो.