मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या आगामी 'की अँड का' य़ा चित्रपटाबाबत खूपच उत्साही आहे. मात्र तिचा हा उत्साह तिच्या शेजाऱ्यांसाठी त्रासाचे कारण बनलाय. या त्रासाल कमी करण्यासाठी शेवटी तिच्या शेजाऱ्यांना पोलिसांना बोलवावे लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी रात्री करीनाने आपल्या मित्रांसाठी पार्टी ठेवली होती. कारण होते की अँड काच्या स्पेशल स्क्रीनिंगचे. यावेळी अमृता अरोरा, सोनम कपूर, करण जोहर, करिश्मा कपूर हे सर्व पार्टीला उपस्थित होते. त्यांची ही पार्टी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. 


यादरम्यान त्यांनी लावलेल्या लाऊड स्पीकरचा आवाजही मोठा होता. अखेर या त्रासाने कंटाळलेल्या करीनाच्या शेजाऱ्यांनी पोलिसांकडे याबाबतची तक्रार केली. 


शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलीस करीनाच्या घरी आले आणि त्यांनी पार्टी थांबवली. जेव्हा पोलिस आल्यानंतर करीना कपूरला लाऊड स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितले तेव्हा तिने आवाज कमी केला. यानंतर काही वेळ पार्टी सुरु होती.