मुंबई : योग्य मानधन न मिळाल्यामुळे चॅनल आणि प्रोड्युसरवर नाराज असलेल्या 'अंगुरी भाभी'नं अर्थातच शिल्पा शिंदे हिनं अखेर 'भाभीजी घर पर है' हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अंगुरी भाभी'ची भूमिका हिट करणारी शिल्पा आता लवकरच कॉमेडियन कपिल शर्माच्या नव्या कार्यक्रमात दिसणार आहे. या कार्यक्रमात ती कपिलच्या भाभीच्या भूमिकेत दिसणार आहे. 


अॅन्ड टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'भाभीजी घर पर है' या कार्यक्रमासाठी शिल्पानं एक वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं... जे आता संपलंय... पुन्हा कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी आपलं मानधन वाढवण्यात यावं, अशी तिची मागणी होती. परंतु, सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं तिनं हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतलाय. या कार्यक्रमात आता अंगुरी भाभीच्या भूमिकेत रश्मी देसाई ही अभिनेत्री घेणार आहे.