मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा 'दंगल' सिनेमाने सर्व विश्लेषकांची भाकीते खरी ठरवताना अवघ्या तीन दिवसांत १०० कोटींहून अधिक गल्ला जमवलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने या सिनेमाने प्रचंड गल्ला जमवला. या सिनेमाने रविवारच्या दिवशी ४२.३५ कोटींची धमाकेदार कमाई केली. 


पहिल्या वीकेंडमध्ये या सिनेमाने १०६.९५ कोटीं रुपये कमावलेत. २००८नंतर आमिरच्या 'गजनी', २००९मध्ये 'थ्री इडियट', २०१३मध्ये 'धूम थ्री', २०१४मध्ये 'पीके' आणि आता २०१६ मध्ये 'दंगल'ने १०० कोटींच्या क्लबलमध्ये प्रवेश केलाय.


या सिनेमाला समीक्षकांसह प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली होती. उत्कृष्ट पटकथेसह दमदार अभिनयामुळेच मोठ्या प्रमाणात दंगलला लोकांचा प्रतिसाद मिळतोय.