नवी दिल्ली :  सुपरस्टार आमिर खानचा चित्रपट 'दंगल'मध्ये छोट्या गीता फोगटचा भूमिका करणाऱ्या झायरा वसीमने सोशल मीडियावर तिच्यासोबत घडलेल्या घटनांनंतर लोकांकडून माफी मागितली होती. झायराने जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुक्ती यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठवली गेली होती आणि तिला ट्रोल करण्यात येत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता की मेहबुबा मुफ्ती यांच्याशी भेट घेतल्यानतर एक गट तिच्यावर नाराज होता. त्यामुळे झायराने माफी मागितली होती. पण माफी मगितल्यावर ३ तासांनंतर झायराने हा माफीनामा सोशल मीडियावरून काढून टाकला. 


झायराने आपल्या फेसबूक आणि टिट्वरवरील माफीनाम्यात म्हटले होते की, ही एक खुली माफी आहे. मला माहिती आहे की नुकतीच मी ज्यांची भेट घेतली त्यामुळे लोक नाराज आहे. मी त्यांची माफी मागते. अजाणतेपणी मी त्यांना दुःख दिले. मी त्यांना सांगू इच्छिते की त्यांच्या भावना मी समजू शकते. विशेष करून गेल्या सहा महिन्यात जे झाले. लोकांनी हे समजून घ्यायला हवे की परिस्थितीपुढे कोणाचे काही चालत नाही. 


झायरा पुढे म्हणते की, मी आशा करते की , लोकांनी हे लक्षात घ्यायला हवे की मी केवळ १६ वर्षांची आहे. त्यामुळे लोकांनी माझ्या सोबत असा व्यवहार करू नये. मी जे केले त्याची मी माफी मागते. मी जाणून बुजून हा निर्णय घेतला नव्हता. मला आशा की लोक मला माफ करतील. 


आपल्या माफी नाम्यात झायराने या गोष्टीवर जोर दिला की काश्मीरच्या लोकांनी मला रोल मॉडेल मानू नये. इतिहासात खूप रोल मॉडेल आहेत. मला रोल मॉडेल म्हणून सादर करणे त्यांचा अपमान होईल. यामाध्यमातून मी कोणत्याही प्रकारचा नवा वाद करू इच्छित नाही. मी जे पण करते आहे त्याचा मला गर्व आहे, असेही तिने यावेळी सांगितले.