मुंबई : धुळव़ड अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलीये त्यामुळे सगळीकडे उत्सवाचे वातावरण असले तरी झी मराठीवरील मालिकांतील सुनांवर संक्रात आल्याचे चित्र आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जय मल्हारमधील बानू असो, तुझ्यात जीव रंगलामधील पाठकबाई असोत, माझ्या नवऱ्याची बायकोमधील राधिका, खुलता कळी खुलेनामधील मोनिका अथवा काहे दिया परदेसमधील गौरी. झी मराठीच्या या सुनांवर सध्या संक्रांतच ओढवल्याचे दिसतेय.


म्हाळसेला आपल्या पूर्वजन्माबद्दलचा इतिहास समजला असला तरीही अद्याप बानू वाड्याच्या बाहेरच आहे. तर दुसरीकडे राणादा-पाठकबाईंचे लग्न अगदी धुमधडाक्यात झाले असले तरी राणादाच्या एका निर्णयामुळे पाठकबाईंना मात्र लग्नाच्या पहिल्याच दिवशी वाड्याबाहेर पडण्याची नामुष्की ओढवलीये आणि त्यांना आता शेतावर रहावं लागतयं.


माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये तर राधिका गेल्या कित्येक दिवसांपासून घराबाहेरच आहे. शनायावर जरी ती कुरघोड्या करत असली तरी अद्याप तिला त्यात पूर्ण यश मिळालेले नाहीये. त्यामुळे एक प्रकारचा वनवासच(प्रेक्षकांच्या मते) तिला सहन करावा लागतोय.


खुलता कळी खुलेना आणि काहे दिया परदेसमधील सुनांवरही अशीच परिस्थिती आलीये. मोनिकाचे सत्य विक्रांतच्या घरात समजल्यानंतर मोनिकाला तिच्या माहेरी धाडण्यात आलेय. 


तर गौरीच्या नोकरीवरुन शिवच्या घरात वादंग उठल्याने गौरीचे वडील तिला आपल्या मुंबईच्या घरी घेऊन आलेत. त्यामुळे तीही सध्या दुखा:त आहे. त्यामुळे मालिकांमधील या सुनांना आपल्या हक्काचे घर पुन्हा कधी मिळणार याचीच प्रेक्षक वाट पाहताहेत.