मुंबई : अभिनेत्री डिम्पी गांगुली हीनं ती प्रेगनंट असल्याचं इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड करून जाहीर केलं. या पोस्टनंतर तीच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होण्याऐवजी टीका होत आहे. 27 नोव्हेंबरला डिम्पीचं रोहित रॉयबरोबर लग्न झालं. 27 नोव्हेंबरला लग्न झाल्यानंतर 7 महिन्यांच्या आत म्हणजेच 20 जूनला डिम्पीची डिलिव्हरी झाल्यामुळे तिच्यावर सोशल नेटवर्किंगवर टीका होत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टीकेवर डिम्पीचा नवरा रोहित रॉय चांगलाच भडकला. ही टीका आता बास करा, रस्त्यात भुंकणाऱ्या कुत्र्यापासून तुम्ही तुमच्या बायकोला वाचवू शकणाऱ्यांपैकी तुम्ही असाल, असं प्रत्युत्तर रोहितनं दिली आहे. 


एनडीटीव्ही इमॅजीन या चॅनलवरच्या राहुल दुल्हनिया ले जाएंगे या मालिकेतून डिम्पी प्रसिद्ध झाली होती. या रियलिटी शोनंतर तिनं राहुल महाजनशी लग्न केलं होतं. या दोघांनी 2015 मध्ये घटस्फोट घेतला होता.