मुंबई : सैराटने ८५ कोटींची कमाई करत सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. सैराटच्या यशानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. नागराज मंजुळे दिग्दर्शित या सिनेमाने खूप मोठं यश मिळवलं असलं तरी नागराज मंजुळे यांना एका गोष्टीची खंत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसात सैराट सिनेमाच्या प्रमोशन आणि इंटरव्ह्यूजमुळे आईला भेटताच आलं नाही, अशी खंत व्यक्त केलीये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी. गेले काही दिवस आपण सिनेमाच्या प्रमोशनमध्ये एवढे बिझी आहोत, त्यामुळे घरच्यांना आणि जवळच्या मित्रांना पुरेसा वेळच देऊ शकलो नाही, अशी भावना मंजुळेंनी व्यक्त केलीये. सिनेमाचा रिमेक होणारे, सिनेमाने सर्वाधिक कमाईचा रेकॉर्डब्रेक केलाय, चाहत्यांचं अमाप प्रेम मिळतंय या सगळ्याचा आनंद आहेच. मात्र त्याचबरोबर या सगळ्या व्यापात घरच्यांसाठी आणि स्वतःसाठीही वेळ राखून ठेवता येत नसल्याची खंत नागराज मंजुळेंनी व्यक्त केलीये. 


पाहा काय म्हणताय नागराज मंजुळे