`सैराट`च्या झिंगनंतर आता `चिंगा फुंगा`ची झिंग चढणार
मराठी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक चांगले सिनेमे येत आहेत. `सैराट` जशी जादू चालली तशी जादू आणखी दोन सिनेमातून पाहायला मिळणार आहे. एक सिनेमा आहे `हाफ तिकीट` आणि ` डिस्को सन्या`.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक चांगले सिनेमे येत आहेत. 'सैराट' जशी जादू चालली तशी जादू आणखी दोन सिनेमातून पाहायला मिळणार आहे. एक सिनेमा आहे 'हाफ तिकीट' आणि ' डिस्को सन्या'.
डिस्को सन्यामधील डायलॉग लयभारी आहेत. नाजिस को सन्या कहते है. डिस्को सन्या. आपल्या घामाची कमाई कोणी हिस्कावली तर आपण त्याचं रक्त काढल्याशिवाय राहत नाही. कोण आहे हा झोपडपट्टी... रस्त्यावर वाढलो ना आपण.... हा पोरगा कोण आहे तुमचा...बाप आहे बाप
या सिनेमातील गाणे रसिकांना नक्कीच तालावर डोलायला लावेल. जय चिंगा फुंगा या गाण्याला सैराटमधील झिंगाट गाण्याप्रमाणे उचलून धरतील. डिस्को सन्या हा सिनेमा ५ ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होत आहे.