सैराटमधील मोठ्या तात्यांबद्दल जाणून घ्या या गोष्टी...
सैराटमध्ये मुख्य भूमिका करणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरुच्या वडिलांची भूमिका अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने रंगवलीये.
मुंबई : सैराटमध्ये मुख्य भूमिका करणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरुच्या वडिलांची भूमिका अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने रंगवलीये.
त्यामुळेच आर्ची, परश्या, बाळ्या, सल्या या पात्रांसोबतच सुरेश विश्वकर्मा यांनी रंगवलेली कट्टर राजकारणी नेता तसेच सधन पाटील ही व्यक्तिरेखा लोकांच्या लक्षात राहते.
सुरेश विश्वकर्मा हे बीडच्या आष्टी तालुक्यातील रहिवासी आहेत. सुरेश यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ते नाटकांत, विविध स्पर्धांत भाग घेत असतं. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने नाट्यशास्त्र या विषयात पदवी घेतली.
अनेक नाटकांतून त्यांनी काम केलेय. तसेच विविध प्रकारच्या भूमिकाही आतापर्यंत केल्यात. सुरेश यांना दीड वर्षांची ओवी नावाची गोंडस मुलगी आहे.