पाठकबाईंच्या मित्राला मुलुंडमध्ये मारहाण
तुझ्यात जीव रंगला फेम पाठकबाईंचा मित्र कल्पेश (खरं नाव मयुर लाड ) याला आणि त्याची मैत्रिण आणि बायकोला मुलूंडच्या आर मॉलमध्ये चार मद्यधुंद तरुणांकडून बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई : तुझ्यात जीव रंगला फेम पाठकबाईंचा मित्र कल्पेश (खरं नाव मयुर लाड ) याला आणि त्याची मैत्रिण आणि बायकोला मुलूंडच्या आर मॉलमध्ये चार मद्यधुंद तरुणांकडून बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.
तुझ्यात जीव रंगला या झी मराठीवरील मालिकेत काही महिन्यांपूर्वी पाठक बाईंचा मित्र म्हणून एक गुजराथी पात्र आले होते. या गुजराती मित्राची भूमिका मयूर लाड याने केली होती.
मयूर लाडच्या एन्ट्रीमुळे मालिकेत वेगळे वळण लागले होते. कल्पेश मालिकेत असताना अक्षय कुमार याने आपल्या जॉली एलएलबीचेही प्रमोशन केले होते.
राणा आणि अंजलीच्या आयुष्यात हड्डी म्हणून पाहण्यात येत होते. त्यामुळे मालिकेत रंगत आली होती.
या अभिनेता मयूर लाडला मद्यधुंद तरूणांनी मारहाण केली. या संदर्भात अजून माहिती मिळू शकलेली नाही.