मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू अझरुद्दिनचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे अझरुद्दिनवर त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलीवूड अभिनेता इम्रान हाशमीनंही अझरला शुभेच्छा देत अनोखं गिफ्ट दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्रान हाशमीनं आपला आगामी चित्रपट 'अझर' चा पहिला फोटो ट्विट केला आहे, आणि अझरला शुभेच्छा दिल्या आहेत. 



 


अझरुद्दिनची क्रिकेट कारकिर्द आणि त्याच्यावर झालेले मॅच फिक्सिंगचे आरोप यावर हा चित्रपट आधारित आहे. 13 मे 2016 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मागच्या वर्षीच लॉन्च करण्यात आला होता. 


पाहा 'अझर'चा ट्रेलर