मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेकांच्या ब्रेकअपच्या चर्चा येणं सुरुच आहे. काही दिवसांपासून मलाईका आणि अरबाज खान यांचा देखील डिवॉर्स झाल्याच्या चर्चा आहेत. पण यंदा एक नवं कारण समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलाईका सध्या तिच्या मुलासोबत वेगळी राहत असल्याची चर्चा आहे. ती स्वत:च मुलाचा खर्च उचलते आहे. त्यामुळे मलाईका ही अरबाज सोबत घटस्फोट घेईल असं म्हटलं जातंय.


घटस्फोट होण्यामागे आता नवं कारण समोर आलंय. अरबाज खानचं अयशस्वी करिअर याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे. सलमान खानच्या आश्रयात राहणं हे मलाईकाला पसंद नाही. सलमान खानला मलाईकाचे कसे ही कपडे घालणे पसंद नाही आणि घरातही तिच्या सोबत अनोळखी व्यक्ती असल्या सारखं वागणूक मिळत असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.


एका कार्यक्रमात जेव्हा मलाईकाला याबाबत विचारण्यात आलं तर तिने यावर बोलणं टाळलं.