मुंबई : आवडत्या कलाकाराची झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स काहीही करू शकतात याचा प्रत्यय आपल्याला अनेकवेळा आला आहे. बॉलीवडूचा खिलाडी अक्षय कुमारलाही असाच अनुभव आला आहे. अक्षय कुमारचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी थेट हरीद्वारवरून सायकलनं आला होता. या चाहत्यानं अक्षय कुमारसाठी हरीद्वारवरून गंगाजलही आणलं होतं.


अक्षय कुमारनं या चाहत्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना अक्षयनं या फॅनबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. हरीद्वारवरून मुंबईला सायकलवर येणं योग्य नाही. माझं तुमच्यावर प्रेम आहे पण कोणीही पुन्हा असं काही करू नका, असं अक्षय कुमार म्हणाला आहे.