चित्रपट : भो भो


दिग्दर्शक : भरत गायकवाड


कलाकार : प्रशांत दामले, सुबोध भावे, अश्विनी एकबोटे, सौरभ गोखले, शरद पोंक्षे


मुंबई : प्रशांत दामले, सुबोध भावे, सौरभ गोखले, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे अशी कलाकारांची भली मोठी स्टारकास्ट असलेला 'भो भो' हा सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित झालाय. अभिनेते प्रशांत दामले अनेक या सिनेमात व्यंकटेश भोंडे नावाच्या एका डिटेक्टीव्हची व्यक्तिरेखा साकारतायेत. कसा आहे भो भो? हा सिनेमा तुमचं मनोरंजन करेल का? काय आहे सिनेमाची गोष्ट?


सिनेमाचं ढोबळ कथानक


'भो भो' या सिनेमाचा विषय एका सॅन्डी नावाच्या कुत्र्याभोवती गुफण्यात आलंय. भरत गायकवाड दिग्दर्शित 'भो भो' हा सिनेमा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅन्डी नावाच्या या कुत्र्यावर एक आरोप आहे... आपल्या मालकीणीवर हल्ला करुन तिला ठार मारण्याचा त्याच्यावर आरोप आहे. एक पाळीव कुत्रा आपल्या मालकीणीवर हल्ला का करणार? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांसोबतच डिटेक्टीव्ह व्यंकटेश भोंडे यांना ही केस सोपवण्यात येते.


डिटेक्टीव्ह व्यंकटेश भोंडे ही केस सॉल्व करतो का? खरंच सॅण्डी या कुत्र्यानंच आपल्या मालकीणीचा खून केलाय, की सत्य काही औरच आहे. हा सस्पेन्स आम्ही उलगडणार नाही, यासाठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल.


कुठे कमी, कुठे जास्त


'भो भो' या सिनेमाची खरी स्ट्रेन्थ या सिनेमाची कथा आहे. दिगदर्शक भरत गायकवाड यांनी सिनेमाचा विषय छान मांडलाय. सिनेमाचा पूर्वार्ध खूपच रंजक आणि धमाल झालाय. अभिनेता प्रशांत दांमले, संजय मोने, सुबोध भावे या सगळ्याच नटांनी आपआपले परफॉर्मन्स चोख पार पाडलेत.


इंटरवलच्या आधी सिनेमाचा फ्लो, त्याची गती चांगली आहे, याचं श्रेय जातं सिनेमाच्या स्क्रिनप्लेला सुद्धा... मात्र, 'भो भो'चा उत्तरार्ध खटकतो. इंटरवलनंतर सिनेमाची स्पीड कुठेतरी हरवते, पटकथा भरकटलेली वाटते. ज्यामुळे सिनेमाचा पूर्वार्ध जितका एन्टरटेनिंग वाटतो तितका उत्तरार्ध वाटत नाही.


प्रशांत दामलेंचा धम्माल अभिनय


अभिनेता प्रशांत दामले यांनी व्यंकटेश भोंडे ही व्यक्तिरेखा खूप सुंदर पार पाडली आहे. या भूमिकेसाठी प्रशांत दामले यांची निवडही परफेक्ट होती, हे सिनेमा पाहताना जाणवतं. नेहमीप्रमाणे प्रशांतच दामले यांची अभिनयाची शैली, डायलॉग डिलीवरी, त्या छोट्या छोट्या जागा भरणं या सगळ्या गोष्टी कमाल वाटतात.


सिनेमातला सस्पेन्सही खुप चांगल्या प्रकारे हाताळण्यात आलाय.. मात्र सेकंड हाफमध्ये तो फ्लेवर मिलींग वाटतो. या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही 'भो भो' या सिनेमाला देतोय ३ स्टार्स...