सिनेमा : रईस


दिग्दर्शक : राहुल ढोलकिया


प्रोड्युसर : रितेश सिधवानी, फरहान अख्तर, गौरी खान


कलाकार : शाहरुख खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, माहिर खान


वेळ : 142 मिनिटे 


जयंती वाघधरे, मुंबई : 'परजानिया' या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी 'रईस' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. शाहरुखच्या रेड चिलीज आणि फरहान अख्तरच्या एक्सेल या निर्मिती संस्थांनी 'रईस' या सिनेमाची निर्मिती केली आहे. रईसचं बजेट जवळपास 90 कोटींचं असल्याचं कळतंय... कसा आहे रईस? हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

80 आणि 90च्या दशकातल्या सिनेमांचा जो फ्लेवर असायचा अशाच काही बॅकग्राऊंडवरचा 'रईस' हा सिनेमा आहे. गरीबो का मसिहा, वाईट तरीही चांगला, टिपीकल बॉलिवूड मसाला सिनेमा आहे 'रईस'... 'रईस' एका गरीब परिवारातून आहे, लहानपणापासूनच रईस कमवायला सुरुवात करतो... 


'कोई धंदा छोटा या बडा नही होता और धंदे से बडा कोई धर्म नही होता' आईनं शिकवलेल्या या तत्वावर आपलं आयुष्य जगायचा निर्णय रईस खूप लहान असतानाच घेतो. कमी वयापासूनच बेकायदेशीर दारुच्या व्यवसायात काम करणारा रईस... एक दिवस स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा निर्णय घेतो. अनेक अडचणींना सामोरं जाऊन रईस स्वत:चा धंदा सुरु करतो... आणि तिथूनच सुरु होतो रईसचा खरा प्रवास...


'रईस' या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अंबालाल मजबुदार या एका सच्चा पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसतो. रईस आणि या पोलीस ऑफिसरची जुगलबंदी ही गोष्टच या सिनेमाचा प्लस पॉईंट आहे. तगडे डायलॉग्स, जबरदस्त अॅक्शन, 80-90वीच्या दशकातल्या सिनेमांचा तोच फ्लेवर, या सगळ्या गोष्टी रईस या सिनेमाचे स्ट्राँग पॉईंन्ट्स आहेत. मात्र या गोष्टींमध्ये काहीही नाविन्य दिसत नाही, हे ही तितकंच खरं...


सिनेमातलं 'जालिम' संगीत


तोच तोच बॉलिवूडचा टिपीकल फॉर्मुला याही सिनेमात पहायला मिळतो. सिनेमाचं संगीत छान झालंय. विशेषकरुन सिनेमाचा बॅकग्राउंड स्कोर रईस या सिनेमाच्या फ्लेवरप्रमाणे जाणारं आहे. लैला, जालिमा आणि उडी उडी ही गाणी छान झालीत.


अभिनेता अतुल कुलकर्णी, शीबा चड्ढा, मोहम्मद जीशान आयुब या कलाकारांनी आपआपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. अभिनेत्री माहिरा खानंनं सिनेमात काहीही वेगळं केलं नाहीय. तिच्या चेहऱ्यावरचे भाव प्रत्येक सीनमध्ये, फ्रेममध्ये एकसारखेच वाटत राहतात... शाहरुख आणि तिच्यातली केमिस्ट्रीही अजिबात हॅपनिंग वाटत नाही. 


या सगळ्यांमध्ये जो खऱ्या अर्थानं भाव खाउन जातो तो म्हणजे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी... त्याच्या वाट्याला आलेले डायलॉग्स, त्याचा अभिनय कमाल आहे. शाहरुख खान आणि नवाज या दोघांची जुगलबंदीही कमाल आहे. 


दिलवाले, फॅन या फ्लॉप सिनेमांनंतर शाहरुखला आता खरंच एका हिट सिनेमाची गरज आहे. 'रईस' इंटरवलच्या आधी फर्स्ट हाफमध्ये चांगला झालाय. मात्र, इंटरवलनंतर सिनेमाची पकड कमजोर होते. सिनेमाचा क्लायमॅक्स कुतुहलात्मक आहे, त्याचं एक्झिक्यूशनही छान झालंय. रईस हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आता काय कमाल करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तेव्हा हे सगळे फॅक्टर्स पाहता आम्ही या सिनेमाला देतोय 2.5 स्टार्स...