विशाल ददलानी विरोधात `एफआयआर` दाखल
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल दादलानी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हरियानाच्या विधिमंडळात जैन संत तरुण सागर यांनी दिलेल्या व्याख्यानाबाबत उपहासात्म ट्विट केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल दादलानी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हरियानाच्या विधिमंडळात जैन संत तरुण सागर यांनी दिलेल्या व्याख्यानाबाबत उपहासात्म ट्विट केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
ददलानी आणि पूनावाला यांनी जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचं 'एफआयआर'मध्ये म्हटलंय. ददलानी यांच्यासह तेहसीन पूनावाला यांच्या विरोधातही 'एफआयआर' दाखल झाली आहे. ददलानी यांच्याप्रमाणेच पूनावाला यांनीही ट्विट केले होते. तसेच ददलानी यांना संत तरुण सागर यांनी क्षमा केली असल्याची माहिती दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली.
संत तरुण सागर यांच्याबाबत ट्विट केल्यानंतर ददलानी यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर दादलानी यांनी या प्रकरणी माफी मागत आपले संबंधित ट्विट काढून टाकले आहे.मात्र दिल्लीतील काही जैन धर्मियांनी ही 'एफआयआर' दाखल केली आहे.