एफआयआरमधील कमिशनर सुरेश चटवाल यांचे निधन
एफआयआर या टेलिव्हिजन शोमध्ये कमिशनरची भूमिका करणारे सुरेश चटवाल यांचे दीर्घ आजाराने रविवारी निधन झालेय.
मुंबई : एफआयआर या टेलिव्हिजन शोमध्ये कमिशनरची भूमिका करणारे सुरेश चटवाल यांचे दीर्घ आजाराने रविवारी निधन झालेय.
सुरेश यांचा मुलगा यमन चटवाल यांनी याबाबत माहिती दिली. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एफआयआरमधील त्यांची सहकलाकार कविता कौशिक यांनी सोशल मीडियावर चटवाल यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केलं.
चटवाल यांनी १९६९मध्ये अभिनयाची कारकीर्द सुरु केली होती. त्यांनी करण-अर्जुन, कोयला आणि मुन्नाभाई एमबीबीएस यासारख्या चित्रपटात काम केले होते.