मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कृती सैननचा आगामी चित्रपट 'राब्ता'चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. चा चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजान यांनी केले आहे. सुशांत सिंह राजपूत या चित्रपटात वैभवची भूमिका करणार आहे, तर कृती प्रियाच्या भूमिकेत दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटातील आपला पहिला लूक सुशांतने ट्विटरवर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये सुशांत आणि कृती खूप आनंदी दिसतायेत. भूषण कुमार या चित्रपटाचे निर्माता आहेत. सुशांत आणि कृतिच्या फॅन्ससाठी आणखी एक खूशखबर आहे. येत्या जूनमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.