मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सिनेमा येणार आहे. 'मोदी का गाव' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. मोदींसारखे दिसणारे बिझनेसमॅन विकास महंते यामध्ये काम करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाचे डायरेक्टर आणि निर्माते सुरेश झा आहेत. सिनेमाची शूटिंग बिहार आणि मुंबईमध्ये झाली आहे. सुरेश झा यांनी सांगितलं की, २ तास आणि १५ मिनिटाचा हा सिनेमा आहे. सिनेमाची शूटींग पूर्ण झाली असून काम अंतिम टप्प्यात आहे. ही बायोपिक नसल्याचं म्हटलं आहे. सिनेमाच्या मेगा प्रीमियरची तयारी सुरु आहे.