मुंबई : राज्यासह देशात आणि देशाबाहेर 'सैराट'चा डंका वाजत आहे. जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स मासिका’ने ‘सैराट’ या सिनेमाची दखल घेतलेय. त्यामुळे  'सैराट'च्या यशात आता जागतिक पातळीवरही मानाचा तुरा खोवला गेलाय.


१०० कोटींची करणार कमाई?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी सिनेमाच्या इतिहासात नवा कमाईचा रेकॉर्ड नागराज मंजुळे यांच्या  'सैराट'ने करुन दाखवलाय. सर्वाधिक कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत हा नवा विक्रम नोंदवला गेलाय.  'सैराट'ची जादू अजून कायम असल्याने १०० कोटी रुपयांची कमाई करेल, असे जाणकारांचे मत आहे.


यांना टाकले मागे


मराठीत यापूर्वी सर्वाधिक गाजलेल्या नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, लय भारी, टाईमपास, टाईमपास-२, तसेच, बालक-पालक या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. आर्ची आणि परश्याच्या जोडीने सर्वानाच मोहीनी घातलेय. नवख्या असणाऱ्या रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरने चांगला अभिनय केलाय. रिंकू राजगुरुला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यातही आलेय.


कौतुकाची थाप


 'सैराट' मध्ये उभरत्या तारूण्यात पदार्पण केलेल्या आणि विरूद्ध जातीमधील असलेल्या या तरूण-तरूणीची प्रेमकथा प्रेक्षकांना भावल्याचे ‘फोर्ब्स’ने म्हटले आहे.