मुंबई : गेले काही दिवस कामातून सुट्टी घेऊन मायदेशी आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा अमेरिकेत रवाना झालीये..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड बरोबरचं हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा ठसा उमटवलेली प्रियांका गेले काही दिवस भारतात आली होती..आसामसह मुंबई आणि इतरही काही शहरात प्रियांका आपल्या फ्रेण्डसना भेटायला जाऊन आली..


इंडस्ट्रीतील फ्रेण्डसबरोबरही तिने फुल टु धमाल केली....आता मात्र तिची सुट्टी संपली असून प्रियांका पुन्हा न्यूयॉर्कला परतलीये..


'माझी सुट्टी संपली असून कामाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायला मी सज्ज झालीये', असं प्रियांकाने सोशल मिडीयावर पोस्ट केलयं..