मुंबई : काही दिवसांपूर्वी आपण नन बनल्याचं जाहीर करणाऱ्या मॉडेल सोफिया हयात हीनं पुन्हा एकदा 'सेक्स सिम्बॉल' बनण्याचं ठरवलेलं दिसतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच सोफियानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत सोफिया पाच वेगवेगळ्या पोषाखात दिसतेय. 


'नमस्ते मी गाया सोफिया आहे... तुम्ही विचार करता, तुम्हाला माहीत आहे मी कोण आहे. हीच खरी गोष्ट आहे' असं या व्हिडिओसोबत सोफियानं म्हटलंय. 


नातेसंबंधात निराशा आल्यानंतर सोफियानं आपण नन बनल्याचं जाहीर केलं होतं. बिग बॉस सीझन 7मध्येही ती दिसली होती. यादरम्यान तिनं अभिनेता अरमान कोहली याच्यावरही छेडछाडीचा आरोप केला होता. यामुळे, अरमानला तुरुंगातही जावं लागलं होतं. 



याशिवाय सोफियानं आपला आणखी एक हॉट व्हिडिओही इन्स्टाग्रामवर शेअर केलाय... यात ती उणे 132 अंश तपमानात आंघोळ करताना दिसतेय.