मुंबई : व्हॉटस अॅपवर झी मराठीवरील होम मिनिस्टरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, पण तो अपूर्ण आहे. या शोमधील दोन बहिणींची भेट कशी झाली, हे अनेकांना रडवणारं आहे. या दोन बहिणींचा भाऊ देखील आहे, पण लहाणपणीच त्याला एक नर्सने दत्तक घेतलंय, या अनाथाकडून नात्याकडे जाणाऱ्या बहिणींना त्यांचा भाऊ देखील मिळो, ही प्रार्थना.


हा व्हिडीओ व्हॉटसअॅपवर व्हायरल होतोय. मात्र हा संपूर्ण व्हिडीओ तुम्ही बातमीच्या खाली पाहू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र हा व्हिडीओ अपूर्ण असल्याने नेमकं काय झालं, या दोन बहिणी आणि भावाची ताटातूट कशी झाली, हे प्रेक्षकांना अजूनही लक्षात येत नसल्याने हा संपूर्ण व्हिडीओ देत आहोत.


कसे झाले अनाथ


आजोबांचं वय ७२ वर्ष होतं, सूनेचं अकाली निधन झालं, मुलगा दारूडा, मग पाच-सहा वर्षाची नात प्रियांकाचा सांभाळ कसा करायचा, म्हणून त्यांनी आपल्या नातीला सिंधुताईंच्या ममता अनाथ आश्रमात दाखल केलं. काही दिवसांनी आजोबांचं निधन झालं.


मोठ्या बहिणीला एकाने दत्तक घेतलं, भावाला एका नर्सने लहाणपणीच दत्तक घेतलंय. मात्र या दोन्ही बहिणी होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि सिंधुताईंच्या मदतीने पुन्हा भेटल्या. यांना त्यांचा भाऊ देखील भेटो या शुभेच्छा!


होम मिनिस्टरचा भाग पहिला



होम मिनिस्टरचा भाग दुसरा



होम मिनिस्टरचा भाग तिसरा



होम मिनिस्टर भाग चौथा