मुंबई: अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टीं या तिकडीनं हेराफेरीमध्ये प्रेक्षकांना हसवून लोटपोट केलं. या चित्रपटाच्या यशानंतर आलेला फिर हेरा फेरीही प्रेक्षकांना भावला. पण हेरा फेरी-3 बाबतची अनिश्चितता अजूनही कायम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेरा फेरी-3मध्ये जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, सुनिल शेट्टी आणि परेश रावल हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटाचं 40 टक्के शूटही पूर्ण झालं, पण त्यानंतर मात्र अजूनही काहीच हालचाली झालेल्या नाहीत. 


या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी तयार आहे, मला मे 2016 ते जून 2016मध्ये वेळ आहे, असं मी प्रॉड्युसर फिरोझ नाडियाडवालाला सांगितलं, पण त्याच्याकडून अजून काहीच उत्तर आलं नाही, असं जॉन अब्राहम म्हणाला आहे. हा चित्रपट बासनात गुंडाळला का हे विचारल्यावर मात्र फिरोजच याचं उत्तर देईल अशी सावध प्रतिक्रिया जॉननं दिली. 


फिरोज नाडियाडवालानं याआधी वेलकम बॅक 2 पण प्रॉड्युस केला होता. पण हा चित्रपट न चालल्यामुळे फिरोजला दिग्दर्शक अनिस बाझमी आणि इतर कलाकारांचे पैसेही देता आले नाहीत, आणि तेव्हापासून फिरोजवरच कर्ज वाढल्याचं बोललं जात आहे. 


त्यामुळेच हेरा फेरी 3 चं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. पण चित्रपट बासनात गुंडाळला का याबाबत मात्र स्वत: फिरोज नाडियाडवालाच उत्तर देऊ शकतील.