मुंबई : 'कॉमेडी नाईटस विथ कपिल'मध्ये कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणारी सुमोना चक्रवर्ती हिनं अखेर आपल्या लग्नाच्या बातम्यांबद्दल तोंड उघडलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडियामध्ये, सध्या सुमोना आणि अभिनेत्री काजोल हिचा चुलत भाऊ सम्राट मुखर्जी याच्या लग्नाच्या चर्चांणा उधाण आलंय. पण, सुमोनानं मात्र या चर्चांणा पूर्णविराम दिलाय. दुबईचं रेडिओ स्टेशन 'जोश ९७८ यूएई'वर रेडिओ जॉकीसोबत बोलताना सुमोनानं आपल्या लग्नाबद्दल वक्तव्य केलंय. 


रेडिओ जॉकीनं सुमोनाला लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता ती जोरदार खिदळली... सम्राटला मी केवळ एकदा दुर्गा पुजेदरम्यान भेटलेय. तो माझा कौटुंबिक मित्र आहे पण, मी अजून लग्नाबद्दल काहीही निर्णय घेतलेला नाही. 


मीडियात सम्राट आणि सुमोना यांच्या नात्याची जोरदार चर्चा होती. २८ वर्षांची सुमोना आपल्याहून ११ वर्षांनी मोठ्या सम्राटसोबत (४० वर्ष) नात्यात असल्याचं सांगितलं जातंय.