बॉलिवूडमध्ये आणखीन एक घटस्फोट

बॉलिवूडमध्ये नात्यांतला चढ-उतार तर नेहमीचाच... सुझान-ऋतिक, फरहान अख्तर-अधुना यांच्यानंतर आता आणखी एक जोडपं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये नात्यांतला चढ-उतार तर नेहमीचाच... सुझान-ऋतिक, फरहान अख्तर-अधुना यांच्यानंतर आता आणखी एक जोडपं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे.
हे जोडपं म्हणजे हिमेश रेशमिया आणि त्याची पत्नी कोमल... हिमेश-कोमलचं गेल्या २२ वर्षांचं नातं तुटायच्या बेतावर आहे. या दोघांनी मंगळवारी बांद्रा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमेश आणि कोमल गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. एकमेकांच्या मताचा आदर करत आम्ही दोघांनी सहसंमतीनं घटस्फोटाचा निर्णय घेतलाय, असं हिमेशनं म्हटलंय.
हिमेश आणि कोमल यांना स्वयम हा मुलगा आहे. दोघांनीही त्याचं पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय.