लंडन : हॉलिवूडची स्टनिंग स्टार अँजेलिना जॉली आता लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकवणार आहे. जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या यूनिवर्सिटीने याची घोषणा केली आहे. अँजेलिना जॉली विजि़टिंग प्रोफेसर म्हणून 'वुमेन, पीस आणि सिक्युरिटी' या विषयावर मास्टर्सच्या विद्यार्थ्यांना धडे देणार आहे.


अँजेलिना जॉलीने म्हटलं की, ती लंडन युनिवर्सिटी ऑफ इकोनॉमिक्सच्या या घोषणेमुळे प्रचंड उत्साहित आहे. तिने म्हटलं की, जगातील इतर शिक्षण संस्थानी देखील असे कोर्सेस सुरु केले पाहिजे. जेथे महिलांचे अधिकार, युद्ध काळातील महिलांचं झालेलं शोषण या विषयांवर चर्चा झाली पाहिजे.