मुंबई : समीक्षकांनी भलेही कॉमेडी चित्रपट हाऊसफुल ३ला पसंतीची पावती दिली नसली तरी प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी या चित्रपटासाठी थिएटरमध्ये मोठी गर्दी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग करताना तब्बल १५.२१ कोटी कमावलेत. पहिल्या दिवशीचा कमाईचा आकडा पाहून वीकेंडमध्ये हा चित्रपट धमाल करेल असे वाटते.


१५ कोटीच्या कमाईसोबतच मोठी ओपनिंग करणारा दुसऱा चित्रपट ठरलाय. या यादीत शाहरुखचा फॅन पहिल्या स्थानी आहे. फॅनने पहिल्या दिवशी १९ कोटींची कमाई केली होती. 


२०१०मध्ये हाऊसफुल हा सिनेमा आला होता. त्यानंतर २०१२मध्ये हाऊसफुल २ सिनेमा रिलीज झाला.