मुंबई : समीक्षकांनी भलेही कॉमेडी चित्रपट हाऊसफूल ३ला पसंतीची पावती दिली नसली तरी प्रेक्षक मात्र या चित्रपटासाठी गर्दी करत असल्याचं या चित्रपटानं जमवलेल्या गल्ल्यावरून दिसत आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या हाऊसफूल 3 नं पहिल्या तीन दिवसांमध्ये 52.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलीजच्या पहिल्याच दिवशी १५ कोटीच्या कमाईसोबतच मोठी ओपनिंग करणारा हा दुसऱा चित्रपट ठरलाय. या यादीत शाहरुखचा फॅन पहिल्या स्थानी आहे. फॅनने पहिल्या दिवशी १९ कोटींची कमाई केली होती. 


२०१०मध्ये हाऊसफुल हा सिनेमा आला होता. त्यानंतर २०१२मध्ये हाऊसफुल २ सिनेमा रिलीज झाला.