बॉलिवूड कलाकारांनी असं केलं होतं प्रेयसीला प्रपोज
फेब्रुवारी महिन्याचा सर्व तरुणाई मोठ्या उत्साहाने वाट पाहात असते. प्रेमाचा महिना समजल्या जाणाऱ्या या महिन्यात व्हॅलेंटाईन विकमध्ये वेगळे-वेगळे डे साजरे केले जातात. कॉलेजमध्ये तर या दिवसांची मोठी धूम असते. बॉलीवूडच्या कलाकारांनी देखील अभिनेत्रींना प्रपोज केलंय. पाहा कसं ते.
मुंबई : फेब्रुवारी महिन्याचा सर्व तरुणाई मोठ्या उत्साहाने वाट पाहात असते. प्रेमाचा महिना समजल्या जाणाऱ्या या महिन्यात व्हॅलेंटाईन विकमध्ये वेगळे-वेगळे डे साजरे केले जातात. कॉलेजमध्ये तर या दिवसांची मोठी धूम असते. बॉलीवूडच्या कलाकारांनी देखील अभिनेत्रींना प्रपोज केलंय. पाहा कसं ते.
१. अभिषेक बच्चन : बॉलिवूडचे ज्यूनियर बच्चनने ऐश्वर्या राय हिला न्यूयार्कच्या एका हॉटेलमधील बालकनीमध्ये प्रपोज केलं होतं. ऐश्वर्याने देखील त्याचा लगेच स्वीकार केला आणि दोघं मग विवाहबध्द झालेत.
२. शाहरुख खान : शाहरूख खानने गौरीला दिल्लीमध्ये एका पार्टीमध्ये प्रथम पाहिलं होतं. त्यानंतर शाहरुख तिला फॉलो करु लागला आणि लवकरच दोघांमध्ये मैत्री झाली. किंग खानने मुंबईच्या बीचवर गौरीला प्रपोज केलं होतं. या वर्षी त्यांच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण होतायंत.
३. हृतिक रोशन : हृतिक आणि सुजान यांची आता फारकत झाली आहे. हृतिकने सुजानला पहिल्यांदा ट्रॅफिक सिग्नलवर पाहिलं होतं. त्यानंतर हृतिकने तिच्या कॉफी मगमध्ये रिंग टाकून दिली होती आणि प्रपोज केलं होतं.
४. आयुष्यमान खुराना : आयुष्यमान याने ताहिरा हिला कॉलेजच्या वेळात कँडल लाईट डिनरमध्ये प्रपोज केलं होतं. यावेळी त्याने गुलाबाने सजावट आणि बॅकग्राऊंड म्यूसिकचं ही प्लॅन केला होता.
५. फरदीन खान : फरदीन याने त्याची पत्नी नताशाला विमानात प्रपोज केलं होतं.
६. बॉबी देओल : तानिया हिला एका हॉटेलमध्ये पाहिल्यानंतर त्याने तिला फोन करणं सुरू केलं. त्यानंतर त्याने तिला भेटायला बोलावलं आणि ती ही भेटण्यासाठी तयार झाली. त्यानंतर बॉबी देओलने तिला प्रपोज केलं होतं.
७. सुनील शेट्टी : सुनील शेट्टी याने माना हिला एका पेस्ट्री शॉपमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर सुनील शेट्टीने तिच्या बहिणीसोबत मैत्री केली. मग मानाच्या बहिणीने दोघांची भेट घालून दिली. त्यानंतर सुनील शेट्टीने प्रपोज केलं आणि ९ वर्षानंतर म्हणजेच १९९१ मध्ये त्यांनी विवाह केला.