हृतिक आणि यामी चित्रपटात एकत्र झळकण्यास `काबिल`
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या `मोहेंजोदडो` चित्रपटाच्या शूटिंगमध्ये फार व्यस्त आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या 'मोहेंजोदडो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये फार व्यस्त आहे. पण, आता तो यामी गौतम सोबत एक चित्रपट करणार असल्याची घोषणा खुद्द हृतिकनेच केली आहे.
'काबिल' असं त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव असणार आहे. संजय गुप्ता या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.
यामी गौतमही हृतिकसोबत काम करण्यासाठी फार उत्सुक दिसते आहे. तिनेही आपण हृतिकसोबत काम करायला फार उत्सुक असल्याचं ट्वीट केलंय. तिचा 'सनम रे' हा चित्रपट येत्या १२ तारखेला रिलीज होतोय.
हृतिकचे वडील राकेश रोशन 'काबिल' चित्रपटाचे निर्माते असणार आहेत.