मुंबई : कपिल शर्माचा कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मधून सुमोना चक्रवर्ती बाहेर पडणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या. या बातम्यांवर आता सुमोनानंच स्पष्टीकरण दिलं आहे. मी हा शो सोडत नसल्याचं सुमोनानं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिलचा हा शो मी एन्जॉय करत आहे. मी याच शो बरोबर राहणार आहे, असं सुमोनानं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. 


कॉमेडी नाईट विथ कपिल या आधीच्या शोमध्ये सुमोना कपिलची बायको दाखवण्यात आली होती, तर या शोमध्ये सुमोना डॉक्टर असलेल्या सुनील ग्रोव्हरच्या मुलीच्या भूमिकेमध्ये आहे. सुमोनानं सलमान खानच्या किक या चित्रपटामध्येही काम केलं आहे.